🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रनंतर आता दिल्लीमध्ये देखील भाजपचं लोटस ऑपरेशन सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी 11 वाजता त्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. आप पक्षाला भाजपने आपले आमदार फोडले की काय अशी शंका होती, त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली होती. मात्र बैठकीदरम्यान आपचे अनेक आमदार नॉट रिचेबल झाले. त्यामुळे आता या बैठकीला आम आदमी पक्षाचे किती आमदार पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
आप पक्षाच्या आमदारांना भाजपकडून 20 कोटींची ऑफरः
आप पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. दिल्लीमध्ये दारू धोरण घोटाळ्यावरून संघर्ष सुरू आहे. आप पक्षाचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा अपयशी ठरला आणि ऑपरेशन लोटस उघड झाल्याचं, आम आदमी पक्षाचा दावा आहे. तसेच काल झालेल्या पत्रकार परिषदेतून बाहेर आलेल्या आमदारांनी त्यांना भाजपकडून 20-20 कोटींची ऑफर देण्यात असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर इतर अनेक आकर्षक आश्वासनही भाजपकडून देण्यात आले आहेत, असं सांगण्यात आलं.
संजय सिंग यांचे भाजपवर आरोपः
आपल्यावर करण्यात आलेल्या दाव्यावर भाजपने उत्पादन शुल्क धोरणे बाबतचा आरोप टाळण्यासाठी आम आदमी पक्ष अशा खोट्या गोष्टी पसरवत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. भाजपने आमच्या आमदारांना धमकवलं आणि 20 कोटी रुपयांची ऑफर्स स्वीकारा नाहीतर सिसोदिया यांच्यासारख्या सीबीआय खटल्याला सामोरं जावं लागेल, असा आरोप संजय सिंग यांनी भाजपवर केला आहे.
दरम्यान, आपच्या वीस ते पंचवीस आमदारांचा संपर्क भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच केजीरवालांनी बोलावलेल्या बैठकीपूर्वी काही आमदारांशी संपर्क होत नसल्याचं अनेक तरक वितर्कांना उधान येत आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Aditya Thackeray | पोस्टरबाजीवरून आदित्य ठाकरे यांचे सत्ताधारी नेत्यांना प्रत्त्युत्तर म्हणाले…
- Rohit Pawar | पोलिसांना आपल्या गावात घर बांधण्यासाठी २५ लाखांचे कर्ज द्या – रोहित पवार
- Shivsena | “सर्वोच्च न्यायालय मध्ये आजच सुनावणी व्हावी” शिवसेना कडून सुप्रिम कोर्टात याचिका
- Rohit Pawar | “लवासाचे खोके बारामती ओके”, रोहित पवार दिसताच सत्ताधारकांनी लावला नारा
- Uddhav Thackeray | ‘खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके’, सत्ताधारी नेत्यांचा शिवसेना पक्षावर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
