Share

Shivsena | “सर्वोच्च न्यायालय मध्ये आजच सुनावणी व्हावी” शिवसेना कडून सुप्रिम कोर्टात याचिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना कडून आज नवीन मेन्शन याचिका सादर करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालय यांनी आजच सुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आज अथवा उद्या सुनावणी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यासाठी सुभाष देसाई आणि अनिल परब कोर्टात धावपळ करताना दिसत आहेत. ही धावपाळ कागदपत्रे गोळा करण्यासाठी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना कडून नवीन याचिकाः

आज दुपारी सुनावणीची मागणी करण्यासाठी याचिका सादर करण्यात येणार आहे. वारंवार सुनावणीची तारीख पुढे ढकळली जात असल्यामुळे ही याचिका करण्यात येणार आहे.

शिंदे गटाचा शिवसेनेवर दावाः

बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. मात्र, धनुष्यबाण हे शिवसेनेचे मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे. त्यामुळे याबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी किमान त्याची सुनावणी करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. यानंतर, शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात शिवसेनेने याचिका दाखल केली होती. या अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. अनेक वेळा याची सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी न झाल्यामुळे आज पुन्हा याचिका करण्यात येणार आहे.

दरम्यान, आज दुपारी याचिका सादर केल्यानंतर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र यावर कोर्ट काय निर्णय घेणार आणि आजच सुनावणी होणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!