Share

आमिर खानने स्पष्ट केले सोशल मीडीया सोडण्याचे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार मीस्टर परफेक्शनीस्ट अमिर खानने नुकताच आपला ५६ वा वाढदिवस साजरा केला. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत सोशल मीडीयाला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यामध्ये कमालीची नाराजी पसरली होती.

यादरम्यान अमिर त्याचा मित्र आमिन हाजी यांच्या ‘कोई जाने ना’ या सिनेमाच्या प्रिमीयरला आला असता त्याने सोशल मीडीया सोडण्याचे खरे कारण सांगितले. यावेळी बोलताना अमिर म्हणाला “मी तसाही सोशल मीडियाचा वापर कुठे करतो. मी तर कायमच माझ्या धुंदीत असतो. मी काही अलविदा वगैरे केलेलं नाही. मी कुठेही जात नाहीए. या अगोदरही मी मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतचं होतो. आता त्यांच्या माध्यमातून मी चाहत्यांशी जोडला जाणार आहे.” असे तो म्हणाला

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अमिरने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत जाहीर केले आहे की, आता मी सोशल मीडियाचा निरोप घेत आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘माझ्या वाढदिवसा निमित्तने तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. मला खूप आनंद झाला. ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे.’ पुढे त्याने लिहिले ‘एकेपीपीएल ऑफीशीएल’ हे माझ्याशी संपर्क करण्याचे अधिकृत माध्यम असेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!