🕒 1 min read
मुंबई: कोरोनाची लस आली लसीकरण सुरु होऊन देखील दोन महिने उलटून गेले मात्र अद्याप देखील कोरोना आटोक्यात आला नसून राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
दरम्यान या बैठकी आधी महाराष्ट्राला 54 लाख कोरोनाच्या लसी दिल्या. मग आतापर्यंत केवळ 23 लाख लसींचच लसीकरण का करण्यात आलं? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून महाराष्ट्र सरकारला कोरोना लसीकरणावरून फटकारले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 23 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 54 लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ 56 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे, असं जावडेकर यांनी सांगितलं.
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state.
First mismanagement of pandemic now poor administration of vaccines.— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 17, 2021
कोरोना लसीकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या टीकेलाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना लसीकरणाचा आकडा माझ्याकडे नाही. आरोग्य मंत्रीच त्याबाबत अधिक माहिती देऊ शकतील. परंतु, भारतीने तयार केलेली ही लस आहे. असं असतानाही ज्यांनी भाजपला निवडून दिलं त्या भारतीयांचं लसीकरण करण्यात आपण स्लो आहोत. परदेशात आपण लस पाठवतो. पाकिस्तानसह परदेशात लस पोहोचवली जात आहे. पाकिस्तानला लस देत असल्याबाबत केंद्र सरकारच्या दानशूरपणाचं कौतुकच आहे. भारतीय लोक लसीकरणात मागे राहिले तरी चालेल, अशीच केंद्राची मानसिकता दिसत आहे, असं सांगतानाच भारतीयांची काळजी घेण्याऐवजी पाकिस्तानी जनतेची काळजी का? याचं आधी उत्तर जावडेकरांनी दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘हा माणूस एक मशीन आहे, चिकू ऑन फायर’ ‘या’ अभिनेत्याने केला विराटवर कौतुकाचा वर्षाव
- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘हे’ उमेदवार उतरणार मैदानात ?
- मॅच फिक्सींग प्रकरणी कारवाईत आयसीसीकडून २ क्रिकेटपटूंवर ८ वर्षांची बंदी
- ‘एनआयए’ने सरकारला घाम फोडलाय हे नक्की, चित्रा वाघांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
