🕒 1 min read
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ८ गडी राखुन पराभव करत जोरदार पुनरागमन केले आहे. या विजयानंतर ५ सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी बढत मिळवली आहे. मात्र एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक मोठा पराक्रम केला आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मात्र पहिल्या तीन फलंदाज ६ षटकांच्या आतच माघारी पतरले. मात्र नंतर विराटने कर्णधारपदाला साजेशी अशी आक्रमक अर्धशतकी खेळी केली. विराटने पहिले रिषभ पंत बरोबर ४० आणि नंतर हार्दिक पंड्यासह ७० धावांची भागीदारी रचली. कोहलीने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावांची खेळी केली.
नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा नाबाद ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत विराटने ५० वेळा नाबाद राहात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. या आधी सचिन तेडुंलकरने ४९ वेळा नाबाद राहात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. त्याच्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी अर्धशतक करत ४८ वेळा नाबाद राहिला आहे.
Some of the best T20 batting I’ve seen! Magnificent shots all around the ground !
The Man is a Machine ! @imVkohli ???? ???????? #INDvENG— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 16, 2021
Chiku on Fire !!!! @imVkohli
let’s gooooo !!!! ???????????????? #INDvENG ???????? ????— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 16, 2021
या खेळी नंतर बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह याने विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रणवीरने विराटच्या खेळीचे कौतुक करणारे दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये रणवीरने म्हटलं आहे, ‘मी सर्वात चांगली टी20 बॅटींग पाहिली. मैदानाच्या चारही बाजूने जोरदार शॉट्स. हा माणूस एक मशीन आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहलं आहे ‘चिकू ऑन फायर’
महत्वाच्या बातम्या
- ‘एनआयए’ने सरकारला घाम फोडलाय हे नक्की, चित्रा वाघांचा घणाघात
- ‘पहिले कोरोना साथीच आणि आता लसीकरणाच चुकीच व्यवस्थापन’ प्रकाश जावडेकरांचे राज्यसरकारवर ताशेरे
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- सुर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्याने गौतम गंभीर नाराज; दिला ‘हा’ सल्ला
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
