🕒 1 min read
मुंबई: अतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फिक्सींग प्रकरणी कारवाई करत दोन अंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर ८ वर्षे बंदी घालण्यात आली. हे दोन्ही क्रिकेटपटू संयुक्त अरब अमिराती या संघाकडून क्रिकेट खेळायचे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत मॅच फिक्स करण्याचा त्यांच्यावर आरोप होता.
मोहम्मद नावीद आणि शैमान अन्वर बट हे दोघे संयुक्त अरब अमिराती या संघाकडुन क्रिकेट खेळायचे. ३३ वर्षीय नवीद युएई कडून ४० एकदिवसीय आणि ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. नावीद आणि त्याचा साथीदार अन्वर बट यांच्यावर २०१९ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर ८ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १६ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होईल.
अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ‘इंटिग्रिटी युनिट’ चे सरव्यवस्थापक अलेक्स मार्शल यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद नावीद आणि शिमन अन्वर यांनी युएईचे प्रतिनिधित्व केले होते. युएईत नवीदची कर्णधार आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून वेगळी ओळख होती. दोन्ही खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात युएईचे प्रतिनिधीत्व केले आहे. असे आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एनआयए’ने सरकारला घाम फोडलाय हे नक्की, चित्रा वाघांचा घणाघात
- ‘पहिले कोरोना साथीच आणि आता लसीकरणाच चुकीच व्यवस्थापन’ प्रकाश जावडेकरांचे राज्यसरकारवर ताशेरे
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- सुर्यकुमार यादवला संघाबाहेर केल्याने गौतम गंभीर नाराज; दिला ‘हा’ सल्ला
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
