Share

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘हे’ उमेदवार उतरणार मैदानात ?

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

दरम्यान विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे समाधान आवताडे, शैला गोडसे,अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भगीरथ भालके यांना जर तिकीट दिले नाही तर मातोश्री जयश्री भालके तिकीट दिले जाईल अशी देखील नावाची चर्चा आहे. नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे असून त्यामध्ये घरगुती कार्यक्रमांबरोबर सांत्वन व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी जवळीक साधून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चाचपणी केली जात होती.

दरम्यान,काही महिन्यांपूर्वी भारत भालके यांचं निधन झालं होतं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!