Share

महाविकास आघाडी सरकारने सावकारी पद्धतीची विजबिल वसुली थांबवावी – आम आदमी पार्टी

Published On: 

🕒 1 min read

पुणे – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.

जग लॉक डाऊन झालेलं असताना बळीराजाने अश्या परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता शेतातलं पीक पोसून सर्वांचं पोट भरायचं काम केलं.त्यावेळी ही संचारबंदी असल्याने हा शेतमाल विकायचा कसा..? असा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कवडी किमतीत माल विक्री केला तर काही शेतकऱ्यांवर माल बांधावर फेकण्याची वेळ आली.

दरम्यान, आम आदमी पार्टीने महाविकास आघाडी सरकारने सावकारी पद्धतीची विजबिल वसुली थांबवावी अशी मागणी केली आहे. ही मागणी करीत असताना शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०% दर कमी करण्याचे आश्वासन आणि काँग्रेस – राष्ट्रवादीच्या शपथनाम्या प्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन याची आठवण आम आदमी पार्टीने करून दिली आहे. महाराष्ट्रातील वीजदर देशात सर्वात जास्त असल्याने ते कमी केले तर जनतेला निश्चित दिलासा मिळू शकतो असे आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे .

मुकुंद किर्दत म्हणाले,जनतेला वीज बिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देऊ असे सांगणाऱ्या सरकारने हा मुद्दा अधिक न ताणता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरगुती मीटर धारकांना सवलत द्यावी. नोव्हेंबर मध्ये काढलेल्या आदेशाप्रमाणे ‘सध्या हप्ते बांधून देत आहोत’ असे सरकार तर्फे सांगितले जात आहे, परंतु सरकार त्यावर व्याज आकारणी करते आहे त्यामुळे याचा कुणालाही फायदा नाही. आता पुन्हा लॉक डाऊन चे सावट असल्याने हि व्याज आकारणी म्हणजे सरकारची सावकारी पद्धतीने वसुली ठरते आहे.ही सावकारी वसुली बंद करावी अन्यथा महा विकास आघाडी ही केवळ ‘जुमलेबाज पक्षांची संधिसाधू युती’ आहे असे जाणत्या नेत्याने स्पष्ट जाहीर करावे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!