Share

आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे नवे सत्र सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये ९ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहे.

क्रिकेट विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएलसाठी  दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी चक्क पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, खगिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया व लुंगी एन्गिडी हे दक्षिण आफ्रिकन खेळाडू पाकिस्तान दौरा सोडून आयपीएलमध्ये खेळणार आहेत. ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनीही या क्रिकेटपटूंसाठी चार्टर्ड प्लेन पाठविण्याची तयारी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींनी पाठविलेल्या चार्टर्ड प्लेनने आल्यास त्यांना सात दिवस क्वारंटाईन राहावे लागणार नाही. मात्र, हे खेळाडू दुसऱया विमानाने आले, तर मग त्यांना नियमानुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!