🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या फॅशनसेन्समुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच उर्फीचा एक नवीन लूक समोर आला आहे. सध्या नवीन लुकचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
उर्फी जावेद नुकतीच तिच्या कारमधून उतरली आणि नंतर लोकांना ईदची मिठाई देऊ लागली. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीने ईदच्या निमित्ताने साडी नेसली होती पण साडीसोबत तिने इतका बोल्ड ब्लाउज घातला होता की लोकांचे होश उडाले. उर्फीने एका महिलेला बोलावून तिच्यासोबत फोटो काढला आहे.
https://www.instagram.com/p/Cf02GjbK13u/
उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

