🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील मोठी वाढ होत आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. यावरुन निर्बंध आणखी कडक केले जाण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांची रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे, असे असले, तरी लोकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
पुढील वर्षी फेब्रुवारी काय किंवा आत्ता काय. वाढती रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकतो. पण पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही. विनाकारण घराबाहेर पडू नका. ओमायक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षण देखील दिसत आहेत. पण ते तसंच राहील का? यावर सविस्तर संशोधन झालेले नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
मत्त्वाच्या बातम्या
- पतीसह सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- “मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये”
- राज्यात आणखी कडक निर्बंध करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा
- “रद्द परीक्षा, रद्दी सरकार…”, आ. भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- अजित पवारांनी अधिवेशनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
