मुंबई : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. अधिवेशन काळात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांकडे सोपवायवला हवी होती, असेही विरोधकांनी म्हणत होते.
विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या या खोचक मागणीवर त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ‘या अधिवेशानात तीन विधेयके मागे घेण्यात आली आहेत. अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पाडले असून शक्ती विधेयकालाही या अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. इम्पिरीकल डेटा संकलित करण्यासाठी 435 कोटी मंजूर करण्यात आली’ अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
विरोधकांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांना उत्तर दिले आहे. ‘मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्या लोकांनी नाक खुपसू नये’ असे रोखठोक उत्तर अजित पवार यांनी विरोधकांना दिले आहे.
दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधीमंडळात येऊन दोन्ही सभागृहाची पाहणी केली होती. विधिमंडळात झालेल्या प्रत्येक विषयात सहभागी होऊन मार्गदर्शन करत होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात येणार होते. परंतु कोरोना संख्या वाढत आहे त्यामुळेच त्यांच्या आम्ही अधिवेशनास न येण्याची विनंती केली होती, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
मत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आणखी कडक निर्बंध करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा
- “रद्द परीक्षा, रद्दी सरकार…”, आ. भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- अजित पवारांनी अधिवेशनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली- संजय राऊत
- “रद्द परीक्षा, रद्दी सरकार…”, आ. भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले


