टीम महाराष्ट्र देशा: आजच्या घडीला शिवसेनेसाठी जनआर्शीवाद यात्रा महत्वाची नाही, सध्या आमचे सर्व लक्ष पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगलीकडे आहे. या भागामध्ये पूर ओसरला तरी साफसफाई आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचवणं गरजेचं असल्याने आम्ही त्याला अधिक महत्व देणार आहोत, असं युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. ठाण्यात उद्यान आणि गायमुख येथील चौपाटीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर व सांगलीमध्ये महापुराने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामध्ये उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. राज्य सरकारकडून जवळपास ६८०० कोटींच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तर अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष पूरग्रस्तांना मदतीला धावून आले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २१ ऑगस्टला पूरग्रस्त कोल्हापूर व सांगलीचा दौरा करणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे सर्व आमदार, खासदार व महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
सुभाष देशमुखांचा दिलदारपणा : १,२ नव्हे तब्बल २४ पूरग्रस्त गावं घेतली दत्तक
सांगलीत जगभरातून मदत येतेय, पण परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत? – आव्हाड
#महापूर : रुपाली चाकणकर पंकजा मुंडेंवर बरसल्या, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

