🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: सांगलीमध्ये पूर आला असून आता जगभरातून पूरग्रस्तांना मदत आहे, मात्र परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विटकरत भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे.
सांगलीत पूर
**
जगभरातून मदत येते आहे
***
सहज आठवले
***
परमपूज्य भीडे गुरुजी कुठे आहेत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 9, 2019
सांगली कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाने उसंत घेतल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होत आहे. आता राज्यातील सर्व राजकीयपक्ष सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप मदतीसाठी एकत्र येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व खासदार, आमदार लोकप्रतिनिधीचे एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे, तर शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये अवघ्या अर्धा तासात जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी उभा करत पूरग्रस्तांनाच्या मदतीला हातभार लावला आहे.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रामदास आठवले आज सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर
कलम ३७० हटवण्यामागे अमेरिकेचा हात; प्रकाश आंबेडकरांचा जावईशोध
सेल्फी वादावर गिरीश महाजनांनी दिले स्पष्टीकरण म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

