Share

#महापूर : रुपाली चाकणकर पंकजा मुंडेंवर बरसल्या, म्हणाल्या…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. यावरून रुपाली चाकणकर यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे याच्यावर टीका केली. त्यांनी ‘महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुठेही फिरकल्या नाहीत. त्यामुळे आता जनताच सरकारला धडा शिकवेल, असा टोला पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार पूरग्रस्त भागामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापुरात महापूर आला. येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळेच यंदाचा स्वातंत्र्य दिन शरद पवार हे पूरग्रस्त भागात साजरा करणार आहेत. १५ ऑगस्टला ते शिरोळमध्ये ध्वजवंदन करणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!