Share

राज्यातले महा वसुली आघाडी सरकार लवकरच अग्नीत जळून भस्मसात होईल – आचार्य भोसले

Published On: 

मुंबई – भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी काल नाशिक येथे राज्य सरकारचा महा वसुली आघाडी असा उल्लेख करत सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत होळी केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला म्हणून हिरण्यकशिपु या राक्षसाची बहिण ‘होलिका’ अग्नीत जळून भस्मसात झाली म्हणुनच आपण ‘होळी’ साजरी करतो. आज राज्यात सुद्धा हेच चित्र सुरु आहे.यावेळी भाजपा नाशिक ग्रामीण युवा मोर्चा संघटन सरचिटणीस समीर काळे, उपाध्यक्ष राहुल बोराडे, चिटणीस पंकज मिश्रा, नरेश कोसरे, सदस्य संतोष मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते

भोसले म्हणाले,हे राज्यातलं ठाकरे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय, महिलांवर अत्याचार , साधु-संतांची हत्या, त्यांची निंदा-नालस्ती आणि जनतेकडून खंडणी वसूल करत आहे. आणि म्हणून आज या होळीच्या पवित्र दिवशी या सरकारचा निषेध म्हणून आम्ही अग्नी देवतेला प्रार्थना केली की आपल्या सत्तेचा आणि शक्तीचा दुरुपयोग करणारं हे राज्यातलं महा वसुली आघाडी सरकार लवकरात लवकर अग्नीत जळून भस्मसात होऊ दे आणि महाराष्ट्राचे कल्याण होऊ दे असं त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!