मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सचिन वाझे याने शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील खंडणीचे आरोप केले होते. आता अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आता त्यांनी थेट दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे परब यांच्या विरोधात तक्रार केलीये. परब यांनी काळ्या पैशातून दापोली येथे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप करत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालय यांच्याकडे देखील तक्रार केली असून याप्रकरणी चौकशी साठी दिल्लीहून पथक येणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे. pic.twitter.com/0lRONJTFmJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 13, 2021
‘पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे,’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केल्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुमचा एक फोन कॉल लहानग्यांसाठी मदतीचा हात ठरू शकतो’, कोरोनात अनाथ झालेल्यांसाठी पार्थ पवार सरसावले
- कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ‘बजाज’ देणार कुटुंबियांना दोन वर्षांचा पगार ! इतकंच नाही तर…
- ‘फक्त जनतेला दाखवण्याकरता लसींच्या ग्लोबल टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे ?’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
- कोरोनाबाधित बालकांचे वाढते प्रमाण! कोविड बाल रुग्णालय उभारणीला मनपाने दिला वेग


