पुणे : कोरोना देशभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांचा आपला जीव या भयावह विषाणूने घेतला आहे. अनेक परिवारांचा आनंद हिरावून घेतलाय. ज्या घरात कालपर्यंत चिमुकल्यांच्या हास्याने आनंद फुलत होता आज तेच लहानगे कोरोनाने डोक्यावरील छत्र हिरावून घेतल्याने अनाथ झाले आहेत. अशा मुलांची मदत करण्यासाठी सरकार पुढे सरसावले आहे.
कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना समाजासाठी घातक आणि गंभीर गुन्ह्याच्या असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल; असे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या विशेष हेल्पलाईनवर, सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329041531 क्रमांकावर अथवा स्थापन करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे.
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी देखील अशा लहान मुलांची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन केले आहे. ‘कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनेक लहान मुलं बेघर, एकटी पडली असून यातना सहन करीत आहेत. अशी बेवारस, अनाथ मुलं अडचणीत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर कळवा. तुमचा एक फोन कॉल लहानग्यांसाठी मदतीचा हात ठरू शकतो’. अस पार्थ पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणाच्या योग्य नियोजनात औरंगाबाद पालिका अपयशी- समीर राजूरकर
- आ.संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट
- ‘… त्यानंतर मला खूप भीती वाटली’ ; ऋद्धिमानने सांगितल्या कोव्हिड काळातील यातना
- ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवारांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तू…’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

