🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी महानगरपालिकेद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील सुमारे तीन हजार बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ४६४ बालकांचा समावेश आहे. कोरोनाबाधित बालकांची वाढती संख्या पाहता मनपाने एमजीएम आणि गरवारे येथील कामांना वेग देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी अधिक धोकादायक असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात दोनशे बेड्स बालकांसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत दुसऱ्या लाटेतच बालकांचे प्रमाण सर्वाधिक वाढत आहे.
फेब्रुवारीत तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट उसळली असून यात बालकांचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. दुसऱ्याच लाटेत हे प्रमाण हळूहळू वाढत असून तिसऱ्या लाटेत यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने आतापासून तयारी सुरू केली आहे.
कोविड बाल रुग्णालय ‘इन प्रोसेस’
पालिकेने शहरात दोन कोविड बाल रुग्णालये उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेने उपचारासाठी केलेल्या नियोजनात शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील व्यक्ती या बालक संवर्गात गृहित धरल्या आहेत. कोरोनाच्या या दुसर्या लाटेतच दिड महिन्यात तब्बल २,८७९ बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलत एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे शंभर बेड्सचे कोविड केयर सेंटर केवळ बालकांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय गरवारे कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातील शेडमध्ये देखील शंभर बेडचे कोविड केयर सेंटर तयार केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसीकरणाच्या योग्य नियोजनात औरंगाबाद पालिका अपयशी- समीर राजूरकर
- आ.संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायात संतापाची लाट
- ‘… त्यानंतर मला खूप भीती वाटली’ ; ऋद्धिमानने सांगितल्या कोव्हिड काळातील यातना
- ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवारांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तू…’
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार ५ हजारांची पेन्शन,शिक्षणही मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

