Share

‘फक्त जनतेला दाखवण्याकरता लसींच्या ग्लोबल टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील स्थगित करण्यात आले असून मुंबई महापालिकेसह राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढत आहे.

मुंबई महापालिकेने १ कोटी लसींचं ग्लोबल टेंडर काढलं असून राज्य सरकारने त्यास परवानगी दिली आहे. तर, ग्लोबल टेंडरसाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करून आक्षेप घेतला आहे.

‘महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय ? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ?’ असा सवाल दरेकर यांनी उपस्थित करत महाविकास आघडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!