Share

गोव्यातल्या शिक्षकाने केला अजीब दावा, गजानन महाराजांनी स्वप्नात सांगितली कोरोनाची लस

Published On: 

पणजी : गोव्याची राजधानी पणजी येथून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. अवघ जग ज्या कोरोनाच्या लससाठी झटत आहे. ती लस  शेगावच्या गजानन महाराजांनी  स्वप्नात येऊन सांगितली असल्याचा दावा एका शिक्षकाने केला आहे. महेश देगवेकर असं या 55 वर्षीय शिक्षकाचं नाव असून आपण महाराजांचे निस्सीम भक्त  आहेत. याबाबतचे वृत्त news18 लोकमत या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले  आहे.

कोरोनाच्या लस बाबत खुद्द गजानन महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितल आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. तर त्यांनी या औषधाबद्दल त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर नाईक यांनी नुकतीच या शिक्षकाची त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली.

याबाबत श्रीपाद नाईक म्हणाले  की, हा आयुर्वेदीक फॉर्म्युला आहे. कोरोनावर औषध सापडलेलं नाही त्यामुळे प्रतिकार शक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल यावर जगभर विचार सुरू आहे. आयुर्वेदीक पद्धतीने त्यात सुधारणा करता येते. प्रतिकार शक्ती वाढवणारी काही औषधं आहेत मात्र त्यांना वैज्ञानिक मान्यता मिळालेली नाही.

देगवेकर यांनी औषधातील घटकांची माहिती दिली. ते  म्हणाले की, लिंबू आणि अद्रक यांच्या रसाचं मिश्रण, त्यात बडीशेपचं पावडर, लसनाचे तुकडे आणि जंगली कारल्याचा रस या सर्वांचं मिश्रण करून हे औषध तयार केलं जातं. तीन दिवसांमध्ये याचा परिणाम दिसायला लागतो. 6 व्या दिवशी तो कोरोनापासून मुक्त होतो आणि 7व्या दिवशी तो घरी जाऊ शकतो.

दरम्यान कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे पण औषध सापडलेलं नाही. अनेक संस्था आणि शास्त्रज्ञांनी लस शोधल्याचा दावा केला असून त्याची परीक्षणं सुरू आहेत. त्याचे अंतिम निकाल येण्यास अजुन काही महिने जाणार आहेत. सगळं जग यावर औषध शोधत आहे. अमेरिका आणि भारतासह इतर देशांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येत कोरोनाची लस मिळवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!