Share

एक विद्यार्थी एक वृक्ष; अजिंठा वन परिक्षेत्राचा उपक्रम, पहिल्या टप्प्यात लावणार २ लाख वृक्ष!

Published On: 

सिल्लोड : अजिंठा वन परीक्षेत्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या अभियानाचा तसेच परिक्षेत्रातील वन जमिनीवर पहिल्या टप्यात लावण्यात येणाऱ्या २ लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वृक्षारोपणाने संपन्न झाला. सोमवारी पिंपळदरी येथील नॅशनल शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, प्रादेशिक वन अधिकारी अनिल मिसाळ यांच्यासह अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी मुख्याध्यापक निकुंभ आदिंची प्रमुख उपस्थिती होती. वृक्ष हे आपले भविष्य असून आहे त्या झाडांचे संवर्धन करणे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

वन विभागाने नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना देणारी तसेच दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या वृक्षाची लागवड करावी. यासाठी परराज्यातून काही झाडे आणणे असतील तर यासाठी मदत करू असे सत्तार म्हणाले. जंगलात होणारी अवैध वृक्षतोड व सतत होणाऱ्या आग लागण्याच्या घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी वन अधिकाऱ्यांना दिले.

अजिंठा वन परिक्षेत्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानात शिवना, पिंपळदरी, अजिंठा, वसई , फर्दापूर, उंडणगाव, सावळतबारा इत्यादी गावांतील विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून या वृक्षाच्या संगोपनासाठी जनजागृती व प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असून परीक्षेत्राच्या वन जमिनीवर १ लाख ५२ हजार तर वडाळी या गावात १ व्यक्ती ३ वृक्ष असे जवळपास २ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवून अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी सुंदर मांगदरे यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!