🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासोबतच महाराष्ट्रात आणखी एक मोठी समस्या निर्माण होत आहे. राज्यात विविध जयंत्या, सण, कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरं आयोजित केली जात असतात. या रक्तदान शिबिरांमध्ये स्वयंस्फूर्तीने नागरिक रक्तदान करत असतात. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे प्रमाण आता अत्यल्प झाले आहे.
यासोबतच, नागरिकांमध्ये कोरोनाची भीती मनात असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घेतली असून विविध आजार, उपचारांसाठी रक्ताची मागणी मात्र वाढत आहे. यामुळे राज्यात रक्तसाठ्याची टंचाई निर्माण होत आहे. यामुळेच नागरिकांनी भीती न बाळगता मात्र योग्य ती खबरदारी घेऊन रक्तदान करावं, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा – @Awhadspeaks#blooddonation pic.twitter.com/jasq9CrkJx
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 1, 2021
‘राज्यात केवळ सात-आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे. आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा,’ असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दीपाली चव्हाण प्रकरणी एम एस रेड्डी देखील सहआरोपी, तात्काळ अटक करा’
- ‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’
- गडकरींचा हा निर्णय म्हणजे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता
- ‘…असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार !’ राज ठाकरेंनी देखील केलं रजनीकांत यांचं खास शैलीत अभिनंदन
- भाजपला कोरोनाशी घेणंदेणं नाही, फक्त सत्तेत येण्यासाठी धडपड सुरु आहे; जयंत पाटलांचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
