🕒 1 min read
नांदेड : विवाहितेला पतीकडून त्रास होत असल्याने तक्रार देण्यासाठी गेले असता दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक संभा कदमला नांदेड जिल्ह्यातील उमरी शहरात एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.
उमरी तालुक्यातील सोमठाणा येथील एका व्यक्तीने तक्रार दिली होती. यात म्हटल्याप्रमाणे, तक्रारदाराच्या २५ वर्षीय चुलत पुतणीचा विवाह बिलोली तालुक्यातील कोळगाव येथील व्यक्तीसोबत करण्यात आला आहे. लग्नानंतर त्यांच्यात सतत वाद होत होते. एके दिवशी पतीने पत्नीला बेदम मारहाण केली व सोमठाणा येथून पळून गेला. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उमरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली.
संभा कदमने गुन्हा दाखल करण्याऐवजी पेट्रोल खर्च म्हणून विवाहितेकडे दीड हजाराची लाच मागितली व दमदाटी केली. मंगळवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलिस उपनिरीक्षक संभा कदमला (५५) उमरी येथील एका हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना पकडले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
