🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच आर्यन खान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आज पुण्यात त्या म्हणाल्या की, जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय, असा सवाल केला आहे. केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे. शाहरूख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलीवूडचे आणि देशाचे नाव एखादा अधिकारी चुकीचे काम करीत असल्यास जगभरात बदनाम होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर केलेल्या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुळे यांच्यावर टीका करताना भातखळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सुप्रिया सुळे यांना चरसी आर्यन खानचा पुळका येणे स्वाभाविक आहे म्हणा… बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळे यांच्यासारखे फुटकळ नेते उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखवतात हे पाहून गम्मत वाटते’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
बापाच्या नावावर आणि जीवावर राजकारणात असलेले @supriya_sule
यांच्यासारखे फुटकळ नेते उठसूट केंद्र सरकारकडे बोट दाखवतात हे पाहून गम्मत वाटते— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 31, 2021
नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
‘कोणत्याही आईसाठी हा खूप दु:खाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात असं झालं तर ते दुर्दैवी आहे. तुम्हा सर्वांच्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीवरुन त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही. मग तरीही त्याला २६ दिवस का अटक केली?, एखाद्या मुलाकडे काहीही सापडलं नाही आणि त्याला २६ दिवस न्यायलयीन कोठडी करत असाल तर हा कुठला न्याय आहे?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
आपण समाज म्हणून याचं चिंतन केलं पाहिजे. कोणाचाही मुलगा असो त्याच्यावर अन्याय झाला असेल तर याचं उत्तर केंद्र सरकारने द्यायला हवं. मीडिया ट्रायल कोणाची होऊ नये. अटलजींच्या काळात जो काय कायदा झाला होता, ड्रग्ज तर फार पुढची गोष्ट आहे. मी तर तंबाखु, गुटखाच्या विरोधात आंदोलन करते. त्यामुळे अशा कोणत्याही पदार्थामुळे समाजात मुलांना रिहॅबील हा महत्वाचा असतो फक्त जेल हा मार्ग नसतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अधिकारी नोकरी करत असताना मंत्री जेलची धमकी देतोय’, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नाराजी
- ‘महाविकास’ आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार; ओवेसींचा घणाघात!
- दिवाळीनिमित्त औरंगाबादेतील बाजारपेठेत तुफान गर्दी; या गर्दीत भेटू शकतो ‘कोरोना’!
- सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले- बाळासाहेब थोरात
- ‘शेतकऱ्यांना बळजबरीने सीमेवरून हटवले तर सरकारी कार्यालयात…’, राकेश टिकैत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

