🕒 1 min read
नवी दिल्ली: तब्बल १२५ वर्षांचा इतिहास असणारा पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकत नाही, असे मत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले आहे.आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा कोणता राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आम्ही काँग्रेस पक्षासाठी लढत असून आमचा लढा सुरु ठेवू असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी जी २३ ने काँग्रेस पक्षात सुचवलेल्या सुधारणा याबद्दलही मत व्यक्त केले. ही एक गोष्ट आहे ज्याबद्दल मला खंत आहे. यामुळे मलाही वाईट वाटतं. हे कोणाच्या विरोधात नसून पक्षाकडे अध्यक्ष हवा. असे त्यांनी म्हटले.
दरम्यान त्यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मॉडेल देशभरात राबवण्याच्या प्रस्ताव दिल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी ५२३ मतदारसंघांमध्ये हे करणं अशक्य आहे. पण जरी आम्ही ४०० उमेदवार दिले तरी भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. आम्हाला अशाच पद्धतीने एकत्र काम करावं लागेल. विरोधकांमध्ये मतांतर येऊ फूट पडू शकते. पण प्रयत्न करायला काय हरत आहे. कारण शेवटी आपल्याला देशाचा नाश करणाऱ्यापासून देशाला वाचवायचं आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
