Share

शहराच्या वाहतूक कोंडीवर वाहतुक शाखेचा नविन उपाय

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर औरंगाबाद वाहतूक शाखेने एक नविन उपाय शोधला आहे. शहर वाहतूक शाखेने खासगी ट्रॅव्हल्सला सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत शहरात येण्यास बंदी घातली आहे. या नियमाचा जर कुणी भंग केला तर कडक कारवाई केली जाईल असेही वाहतूक शाखेने सांगितले आहे. तसेच परवानगी असलेल्या कालावधीत ४० किमी प्रतितास ही वेगमर्यादाही ठरवून दिली आहे.

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही वाहनचालकासाठी आणि वाहतूक शाखेसाठी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरली आहे. सध्या शहरातील मुख्य रस्ता जालना रोड च्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी काही दिवस राहणार आहे. तसेच अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून वाहतुक शाखेने या वाहनावर कारवाई न करता खासगी ट्रॅव्हल्स आणि लक्झरी बसेसला सकाळी सात ते रात्री आकरा या वेळेत शहरात प्रवेशबंदी केली आहे. या नविन नियमानूसार दिवसा या बसेसला शहरात प्रवेश हवा असेल तर त्यांना रितसर अर्ज करुन परवानगी घ्यावी लागेल, असे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले.

शहरात दिवसभरात प्रचंड वाहतुक कोंडी असते, या दरम्यान जर एखादे मोठे प्रवासी वाहन शहरात आले तर आपघात होण्याची शक्यता असते. नविन बदलानुसार आता शहरात पुणे-अहमदनगर, धुळे-वैजापूरकडून येणाऱ्या बस नगर नाका, लोखंडी पूल, बाबा पेट्रोल पंपमार्गे पंचवटी व परत नगर नाकापासून पुढे जातील, तर पैठणकडून येणाऱ्या बसेस लिंकरोड, महानुभाव आश्रम चौक, बीड बायपासवरून संग्रामनगर उड्डाणपूल मार्गे शहानूरमियाँ दर्गा चौकापर्यंत येतील. आणि जालनाकडून येणाऱ्या बसेस केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड बायपास, गोदावरी टी मार्गे शहानूरमियां दर्गा चौकात येतील. जळगावकडून येणाऱ्या बसेस हर्सूल टी, जळगाव टी, चिकलठाणा, केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड बायपासमार्गे पुढे जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!