🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. सत्ताधारी भाजप पक्षात चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या गॅगचे लोकं मोठ्याप्रमाणात कार्यरत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, भाजपमध्ये दाउद गॅगचे लोकांची मोठी संख्या आहे. तर उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजेश सिंह यांचा १९९२ मध्ये झालेल्या जे.जे. हत्याकांड सहभाग होता. त्यांचा दाउद गँगंशी संबध आहे. याप्रकरणी खासदार सिंह यांच्यावर टाडा सुद्धा लावण्यात आला होता.
तसेच भाजपच्या आयटी सेलमध्ये सुद्धा दहशतवादी संघटना असलेल्या ISIS ची लोकं कार्यरत असून त्यांना अनेकवेळा अटक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे ज्यांची अशी परिस्थिती असेल अशा लोकांनी आमच्या बाबतीत बोलू नयेत. तसेच चाळीस पैश्यासाठी ट्विट करणाऱ्या आम्ही भाव देत नसल्याचे मलिक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानातील लोकांची प्रशंसा केल्यानंतर भाजपकडून टीका होत असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना नवाब मलिकांनी भाजपला चांगलेच टोले लगावले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176098418898292737?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176098255001620481?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176097903099559936?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
