Share

गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोविड केअर सेंटर उभारणार- आ.बंब

Published On: 

🕒 1 min read

गंगापूर : गंगापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब लवकरच दुर करून तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रावर आवश्यक आरोग्य सुविधांसह कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

गंगापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात कोरोना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी गंगापूर तालुक्यातील वैद्यकीय सध्यास्थितीसह बाधीत रुग्ण, बरे झालेले रुग्ण चाचण्या वाढवण्यासाठी प्रशिक्षणाचे नियोजन, व्हेटिंलेटर कोविड केअर सेंटर आदी बाबत त्यांनी माहिती दिली. दरम्यान, गंगापूर शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ही चिंतेची बाब असून लवकरच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक आरोग्य सुविंधासह १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार बंब यांनी सांगितले. या काळात प्रशासनास कोरोना प्रतिबंधासाठी राबवत असलेल्या उपययोजना महत्त्वपूर्ण निर्णय नागरिकांनी घ्यावयाची काळजी निर्बंध याची माहिती गाव पातळीवर पोहोचण्यासाठी जनजागृती करून प्रबोधन करण्यात भर दिला पाहिजे असल्याचे ते म्हणाले.

प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध राबवा, रुग्णांवर उपचार करताना नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळाला पाहिजे, ग्रामीण भागात तलाठी,  ग्रामसेवक, मेडिकल ऑफिसर यांनी गाव निहाय आढावा घेऊन कोरोना विषाणूवर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी योजना तयार करावी अशा सुचना आ. बंब यांनी बैठकीत दिल्या. याप्रसंगी तालुक्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अविनाश शिंगटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश पवार आदींसह वैद्यकीय अधिकारी, तहसील कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!