Share

माणुसकीचे दर्शन ! एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजाराची मदत

Published On: 

तुळजापूर : तालुक्यातील मसला खुर्द येथील अंबरजना राजेंद्र कुंभार या शेतकरी महिलेने कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश सोमवार दि.२० रोजी तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या कडे पती राजेंद्र कुंभार व पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या उपस्थितीत सपूर्द केला.

अंबरजना राजेंद्र कुंभार यांच्या पतीचे तुळजापूर येथे शेतीस लागणाऱ्या मोटार साहित्य विक्री व दुरुस्तीचे विमल मशनिरी स्टोअर्स नावाचे दुकान आहे.

सदरील गरीब दांम्पत्य संत गोराबा काका पुण्यतिथी निमित्ताने अन्नदान किर्तनाचा कार्यक्रम घेतात यंदा हा कार्यक्रम रद्द करुन यावर होणारा खर्च कोरोना ग्रस्तांचा मदतीसाठी देवुन अनोखी माणुसकीचे दर्शन या संकट काळात घडवले.

विशेष म्हणजे अंबरजना राजेंद्र कुंभार यांचे सासरे कुंभार चा व्यवसाय करतात यंदा डेरे रांजन विकले नसतानाही त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने कुंभार कुटुंबियांचे सर्वञ कौतुक होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!