Share

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वेगळे चित्र! अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि मंत्री अतुल सावे एकत्र

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : 2 वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर, यंदाचा गणेशोत्सव 2022 मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठीकाणी गणपतीच्या आगमन सोहळ्याचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवाबाबत केवळ वडीलधारी मंडळीच नाही तर लहान मुलांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री अतुल सावे एकत्र असल्याचे पाहायला मिळाले.

संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि मंत्री अतुल सावे यांनी एकत्र येत डीजेच्या तालावर ठेका धरला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चेर्चेला उधाण आले आहे.

अतुल सावे म्हणाले, दोन वर्षे औरंगाबादमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निर्बंधमुक्त गणेशोउत्सव साजरी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबादमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही सर्वजण आम्ही पक्षातला मतभेद बाहेर ठेवून हा उत्सव साजरा करत आहोत.

अतुल सावे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट नाराज-

अतुल सावे यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण गरम आहे. संजयशिरसाट यांची नाराजी आता स्पष्टपणे दिसून येत आहे. रविवारी औरंगाबादेत रस्त्यांच्या कामांशी संबंधित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना शिरसाट यांनी मंत्रिमंडळात समावेश न केल्याने ते असमाधानी दिसले. त्यांच्या नाराजीचे एक कारण म्हणजे भाजपचे राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

वरिष्ठता नावाची काही गोष्ट राहली नाही-

शिरसाट म्हणाले, “मी अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे यांच्यासोबत काम केले आहे. मी त्यांच्या वडिलांसोबत काम करत असताना अतुल सावे राजकारणात येतील असे कधीच वाटले नव्हते. अतुल सावे आधीच्या सरकारमध्ये मंत्री झाले आणि आता कॅबिनेट मंत्री झाले आहेत. वरिष्ठता नावाची काही गोष्ट राहली नाही.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!