Share

IND vs HK | कधी आहे सामना? कुठे पाहाल ‘आशिया कप 2022’ सामना थेट LIVE

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आशिया कप 2022 मध्ये भारताचा दुसरा सामना 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाशी होणार आहे. रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या रोमहर्षक लढतीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. हाँगकाँगविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रोहित अँड कंपनी आता पुढील फेरीत जाण्याचा प्रयत्न करेल. भारताचे गोलंदाजी आक्रमण पाकिस्तानविरुद्ध शक्तिशाली दिसत होते. स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध काही धावा केल्या आणि ही हाँगकाँगच्या गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा आहे.

अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानविरुद्ध धोकादायक गोलंदाजी करत 4 बळी घेतले.हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले आणि नाबाद 33 धावा करत अष्टपैलू कामगिरी केली. भुवनेश्वर आणि हार्दिक या दोघांनीही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवावा अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड यांना केएल राहुल आणि रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता असेल. केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांना हाँगकाँगविरुद्ध काही धावा करून फॉर्म परत मिळवायचा आहे.

आशिया कप 2022 आजचा सामना कुठे पाहाल?

भारत आणि हाँगकाँग यांच्यात आशिया चषक सामना आज (31 ऑगस्ट, मंगळवार) होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे प्रसारण केले जाईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

हाँगकाँगची प्लेइंग इलेव्हन-

यासीम मुर्तजा, निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (डब्ल्यूके), जीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गजानफर, आयुष शुक्ला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!