Share

Eknath Khadse | “पंकजा मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे, म्हणून…” ; एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री पदासाठी वाट न पाहता थेट वरिष्ठ नेतृत्वाकडे जाऊन दाद मागावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत त्यांनी वर्षोंवर्ष भाजपच्या विस्तारासाठी काम केलं आहे. मात्र, त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय झाला असल्याचं खरं आहे, असं खडसेंनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी यांनी दिली पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफरः

पंकजा मुंडेंवर अन्याय होतअसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील निर्माण झाली असून अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. मात्र, त्यांना राष्ट्रवादीमध्ये यायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे, असं देखील खडसे म्हणाले.

दरम्यान, राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांची मंत्री पदावर वर्णी लागावी, अशी मागणी केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. विधानपरिषदमध्ये देखील भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर कार्यकर्ते भाजप विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!