Share

मराठा समाजाला एकटं पाडण्याचा कुटील डाव? नोकर भरती थांबवण्यासाठी खा. संभाजीराजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियांसह शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणावर देखील टाच आली आहे. त्यातच काल तब्बल १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल अशी घोषणा केल्यानंतर मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या वतावरणात भरतीची घोषणा ऐकून दुःखी झाल्याचं राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

” ५८ मोर्चाना सर्वच समाजाचा पाठींबा मिळाला होता. मात्र आता मराठा समाज व्यथित असताना आरक्षण स्थिर करण्याऐवजी अशी घोषणा करणे म्हणजे मराठा समाजाला एक प्रकारे चेतावणी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही भरती पुढच्या टप्प्यात देखील घेतली जाऊ शकते, तर आत्ताच का घ्यायची आहे?” असा सवाल देखील राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.

संभाजीराजेंनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र-

संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अश्या अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज ह्या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असून सुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली, हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहेत.

मी शासनाला एकच सांगू इच्छितो, की मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार.

जे आरक्षण मिळाले होते, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत, कोणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये.

सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!