Share

जळगाव महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती – अनिल देशमुख

Published On: 

मुंबई : जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या.

जळगाव येथील महिला वसतीगृहात घडलेल्या घटनेची चौकशी करण्याकरिता चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केले आहे. विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री यांनी ही माहिती दिली.

तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकरणावरून कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून मुनगंटीवारांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!