🕒 1 min read
सांगली : बंदसाठी एसटी कामगारांना फूस लावून आटपाडी बस आगाराचे गेट बंद केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ७० जणांवर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आमदार पडळकर यांनी एसटी कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह शनिवारी सायंकाळी आटपाडी एसटी आगाराचे गेट बंद केले होते.
गोपीचंद पडळकर हे आपल्या खास धनगरी शैलीच्या बोलण्यामुळे आणि त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सतत चर्चेत असतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांनी आटपाडी डेपोचे गेट बंद करून आंदोलन छेडले होते. यावेळी बोलताना पडळकर यांनी अभिनेता शाहरूख खानच्या चिरंजीवाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर त्याच्या पंचतारांकित जेवणाची काळजी करणारे सरकार २८ कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले तरीही त्यांच्या मुलभूत आणि हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील नाही, असे टिकास्त्रही केले होते.
तर आटपाडी एसटी आगारात शनिवारी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी आमदार पडळकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर काही कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी एसटी आगाराचे गेट बंद करून एसटीची अडवणूक केली. याबाबत पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह एकूण ७० एसटी कामगारांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक


