Share

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Published On: 

पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. ही धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत याकरिता भाजपच्या कसबा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्याने शंखनाद आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी फरासखाना पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु पोलिसांनी कोरोनामुळे परवानगी नाकारली होती.

मात्र, तरीही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर शंखनाद आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता आंदोलन करून गर्दी जमवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोनामुळे महाविकास आघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सरकारने लवकर मंदिरे उघडी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट रोजी राज्यभरात विविध ठिकाणी शंखनाद आंदोलन करण्यात आले होते.

पुणे येथे कसबा पेठ गणपती मंदिरासमोर शंखनाद आंदोलन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, स्वरदा बापट, नगरसेवक दीपक पोटे, राजेंद्र मानकर, राजेश येनपुरे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह संजय देशमुख, बापू नाईक, निलेश कदम, राजू परदेसी, पुनीत जोशी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 188 269 270, यासह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन 2005 चे कलम 51 (ब), 37(1) (3) 135 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रवींद्र दहातोंडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!