Share

पुण्यात तुफान गर्दी केल्याप्रकारणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह १५० जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

पुणे : काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत.

पण असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तुफान गर्दी पाहून कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी पहायला मिळाले. या प्रकरणानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती.

दरम्यान आता सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निलम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे, युवक अध्यक्ष महेश हांडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक अध्यक्ष महेश हांडे यांनी कार्यक्रमाकरीता ध्वनीक्षेपणाची परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यात सध्याचे कोविड संसर्गाबाबत शासनाने दिलेल्या अटी व शर्तींचे तंतोतत पालन करुन सामाजिक सुरक्षित अंतर व सर्व जण मास्क लावतील, असे या अर्जात नमूद केले होते. नोटीसप्रमाणे व शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे त्यांनी पालन न करता उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राने काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहिला आहे. कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले त्याचा देखील भार सर्वसामान्यांना सोसावा लागला. अशा बिकट परिस्थितीतून महाराष्ट्र सावरत असताना राजकीय पुढारी मात्र अशा प्रकारची गर्दी करून नेमके काय साध्य करू पाहत आहेत अशी विचारणा आता पुणेकरांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!