मुंबई: गेल्या आठ दिवसात संजय राऊत यांनी चार वेगवेगळे आरोप केले परंतु त्यांनी एकही कागदपत्र दाखविली नाहीत त्यानंतर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे थोटांड उघडकीस आणले त्यानंतर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाआदेश दिले की किरीट सोमय्या , मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा.. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निकॉन इन्फ्रा मध्ये किरीट सोमय्या यांच्या परिवाराची आणि पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील वाधवान यांची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी त्यांना लवकरच ठाकरे सरकार अटक करणार असल्याची माहिती दिली आहे.
यासोबतच किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील व्हायरल झालेला फोटो याबाबत किरीट सोमय्या यांनी त्यांच्या सुरक्षा संदर्भातील तक्रार महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे केली होती ज्यामध्ये केंद्रसरकार ने दिलेल्या सुरक्षा अहवालात हा फोटो प्रताप सरनाईक यांनी काढला असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांना कधी अटक करणार असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
-
राज्यात मास्कमुक्ती होणार? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण
-
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार
-
“तु माझ्यासाठी नेहमीच ‘चिकू’ राहशील” युवराजने लिहले विराटला भावनिक पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
