🕒 1 min read
मुंबई : नुकतीच १९ फेब्रुवारीला देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त गडहिंग्लजचे जवान प्रदीप तोडकर यांनी १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. हाच धागा पकडत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अतुल भातखळकर म्हणाले, “हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान उत्साहात शिवजयंती साजरी करत आहेत आणि मुंबईत मुख्यमंत्री घरातल्या घरात गारठले”
काल (सोमवार) देखील अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. “तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे दोघांमध्ये जास्त दिवस घरात कोण बसुन राहत याची चाचपणी सुरु आहे. फोटो इव्हेंट आणि राजकीय नौटंकी एवढाच याचा अर्थ आगे,” असे भातखळकर म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
