🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक भाजप कार्यकर्ते भरभरून प्रेम करतात. मोदींच्या अशाच एका मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका ६३ वर्षीय भाजप कार्यकर्तेने नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. तब्बल २२ दिवस चालत होते. देवरी येथून प्रवास सुरु केल्यानंतर ११ ऑक्टोबरला ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले.
यावेळी त्यांनी मोदींकडे आपल्या भागात उद्योग सुरु करण्याबाबत तसेच विविध मागणीचे पत्र दिले आहे. पत्रामध्ये छोटेलाल अहिरवार आपल्या पत्रात अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास तसंच बेरोजगारीचा मुद्दा देखील उपस्थित केला. रोजगार निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग आपल्या भागात आणावेत अशी विनंती त्यांनी केली.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के प्रति जन-जन के हृदय में अपार स्नेह है, वहीं देश का हर नागरिक उनके लिए प्रिय है। पीएम श्री से भेंट के लिए मप्र के सागर जिले के देवरी से पैदल चलकर दिल्ली पहुंचे @BJP4MP कार्यकर्ता छोटेलाल अहिरवार से उन्होंने मुलाकात कर हम सभी को अभिभूत कर दिया। pic.twitter.com/RClolb01vc
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) October 14, 2021
१४ ऑक्टोरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर छोटेलाल दुसऱ्या दिवशी ट्रेनने सागरला परतले. “ विशेष म्हणजे मोदींना भेटताना छोटेलाल यांनी भाजपाचा झेंड्याचे कपडे परिधान केले होते. यावेळी छोटेलाल यांनी सांगितलं की, मोदींनी त्यांना भेटण्यासाठी पायी येण्याची काय गरज होती असं विचारलं. पण पायी आलो नसतो तर भेट झाली नसती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मिठी मारली. तसंच सरकारने गरिबांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती दिल्याचेही सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास
- भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय
- ‘अजितदादांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?’
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
