औरंगाबाद : मी स्वतः इच्छेने आत्महत्या करत आहे.माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये अशी चिठ्ठी लिहून ३६ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार (ता.१) उघडकीस आली .याप्रकरणी जीन्स पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेख असिफ शेख अनावर वय ३६ रा.सलमा मशीद जवळ संजय नगर बायजीपुर हार्डवेअर दुकानात काम करत होता.मात्र लॉक डाऊन पासून काम बंद होत.यामुळे घरीच होतं.दरम्यान सोमवार ता. ३१ रोजी घरातील सर्व मंडळी लग्नाला गेले.यावेळी असिफ हा घरी एकटाच होता.घरात असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.दरम्यान लग्न आटपून घरचे घरी आल्यानंतर घरच्यांना हा प्रकार लक्षात आला.
यावेळी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.असिफ याच्या खिशात चिठ्ठी सापडली चिठ्ठी लिहिले आहे की,मी स्वतः इच्छेने आत्महत्या करत आहे.माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जे.जी.जेढर करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक
- ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

