🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात यंदाच्या वर्षी लांबलेल्या पावसाने एका बाजूला शेतीचे प्रचंड नुकसान केले असतानाच राज्याच्या विविध भागातील भूजल पातळीत मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदतच होणार आहे. राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. डिसेम्बर अखेरीस पुन्हा एकदा होणाऱ्या सर्वेक्षणात भूजल पातळीत नेमकी किती वाढ झाली हे अधिक स्पष्ट होईल असं यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल पुण्यात सांगितलं.
तर दुसऱ्या बाजूला तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आंबोलीत तब्ब्ल 430 इंच पाऊस पडल्याची माहिती आंबोलीच्या सरिता मापन केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे.
सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजी बरोबरच चारशे इंच पाऊस पडणाऱ्या मेघालयातल्या मौसिंरामला देखील आंबोलीन यावर्षी मागे टाकलं आहे. गेल्या 25 वर्षातला हा उचचांक असून यंदा आंबोलीत सव्वाशे इंच पाऊस जास्त पडलाय. हा खरतर विश्वविक्रम आहे.
यावर्षी जूनमध्ये 40 इंच तर जुलैच्या दोन आठवडे पाऊस अगदीच कमी होता. मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसान झोडपून काढलं आणि ऑगस्ट मध्ये तर पावसानं जोर मारून रेकॉर्ड केलं. अर्थात अति पावसाचा फटका आंबोलीतल्या हॉटेल व्यावसायिक, शेतकरी आणि वर्षा पर्यटनाला सुद्धा बसला. पण आंबोलीत अनेक वर्षानंतर असा जागतिक विक्रम करणारा पाऊस यावर्षी झाला हे मात्र खरं.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192366804011610113?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192366593650487296?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
