Share

आरएसएस ही दहशतवादी संघटना, मी भागवतांच्या नेतृत्वात अनेक बॉम्बस्फोट घडवलेत 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आज विजयादशमी उत्सव साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक पी. विजय शंकर रेड्डी यांनी संघावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मी विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वात बॉम्बस्फोट घडवलेत अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

पी. विजय शंकर रेड्डी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वात मी अनेक बॉम्बस्फोटात सहभागी होतो. संघाने आजवर अनेक अतिरेक्यांना जन्म दिला आहे असं म्हणत देशभक्तीच्या नावावर आणि संघाच्या निर्देशानुसार माझ्या हाताने अनेकांचा बळी गेला असं रेड्डी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना रेड्डी यांनी मी बारा वर्षे संघाचा प्रचारक म्हणून काम केले. यादरम्यान अनेक अनुचित गोष्टी घडल्या. ज्या चुकीच्या होत्या याची जाणीव मला झाली आणि मी संघाला रामराम ठोकला. बॉम्बस्फोटासारखे कृत्य संघाने केले असून मी देखील त्याचा एक भाग होतो. माझ्याजवळ या संदर्भातील सर्व पुरावे आहेत. संघाने माझ्यावर दोनवेळा प्राणघातक हल्ला केला आहे असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, संघाचे काम असहाय्य झाल्याने काहींनी विष घेऊन तर काहींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. असे निराश झालेले अनेक प्रचारक माझ्या संपर्कात आहेत. अशांना घेऊन मी लवकरच दिल्ली येथे संघातील बढय़ा नेत्यांच्या नावांचा खुलासा करणार असंही विजय शंकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181450463389995008?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181446252577226752?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181443943717720065?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!