🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :- निवडणुका लागल्या तरी भाजपमध्ये होणारी भरती थांबायचं काही नाव घेत नसल्यचं दिसत आहे.कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून देखील नमिता मुदंडा यांनी भाजपलाचं जवळ केल आहे.
मुळचे भाजपचे असलेले मुंदडा पुन्हा स्वगृही परतले याचा आनंद आहे. खरे तर भाजपमध्ये मेगा भरतीची सुरवात सुरेश धस यांच्या प्रवेशाने आम्हीच बीडमधूनच केली आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मेगा भारती बाबत भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले आहे. एका वेळी ५ आणि ६ आमदार पक्षांतर करत आहेत. यामुळे राज्यात निवडणुकी आधीच विरोधी पक्षांचे अस्तित्व संपले असल्याच बोललं जात आहे.
दरम्यान नमिता मुदंडा यांच्या पक्षांतरामुळे कॉंग्रेस आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनी बीडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात परळीतून धनंजय मुंडे, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळके, गेवराईतून विजयसिंह पंडित आणि केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवारी असतानाही नमिता मुंदडा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178635548736421888?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178635320008396800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178633335335075840?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
