Share

… तर मी खासदारकीचा राजीनामा देईल – सुजय विखे 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेचं नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान नेते एकमेकांवर टीका आणि आरोप करत आहेत. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये सुजय विखेंनी भ्रष्टाचार केला असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला सुजय विखेंनी उत्तर दिले आहे.

डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सुजय विखे यांनी राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल असं विधान केले आहे.

पुढे बोलताना सुजय विखे यांनी यंदा तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या उसावर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची नजर आहे. गळीत हंगामात उसाबाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्याला नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत ठरली. यंदा डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला, तर ते अडचणीचे ठरू शकते असं विधान केले आहे.

दरम्यान, यावर्षी नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांशी भागामध्ये अत्यल्प पाउस झाला आहे. त्यामुळे उसाचे पीक संकटात आहे आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178612189734690816?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178610994911666176?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178605787062493184?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!