Share

कुपवाडातील बटोटमध्ये भारतीय सैन्यादालावर ग्रेनेड हल्ला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील रामबन परिसरातील बटोट येथे शनिवारी (ता. २८) भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर चकवा कँप येथे हा हल्ला केला. घटनेची माहिती कळताच रामबनच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षक अनिता शर्मा या इतर काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत लगेचच घटनास्थळी पोहोचल्या.

दोन संशयितांनी बटोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ येथव एक वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सैन्यदलावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात कोणतीही वित्त हानी झाली नसून कोणालाही दुखापत झालेली नाही. तरीही सैन्यदल, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा या भागात शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी सैन्यदलाला काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा येथील नियंत्रण रेषेपाशी दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतरच आज हा हल्ला झाला.

गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर घुसखोरीचा कट रचण्यात आला आहे. या मध्यमातून ते दहशतवादी आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत पाठवणार असल्याची माहिती मिळाली होती. या घुसखोरीसाठी ते स्थानिक नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत या दहशतवादी कारवाया करत असल्याचेही वृत्त गुप्तचर यंत्रणांनी दिल होत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177899956130107392?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177899702294999042?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!