Share

देखाव्याचे अनुकरण करताना चिमुकल्याला गळफास

Published On: 

पुसेसावळी (जि. सातारा) : देशभर सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून वातावरण तापल्याच चित्र आहे . राज्यात सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम सुरु आहे . मात्र गणेशोत्सव मंडळाने केलेल्या शेतकरी आत्महत्येच्या देखाव्याचे अनुकरण करताना गळफास लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी वडगाव येथे घडली.

सुमित प्रमोद शिंदे (१३, रा. गोरेगाव वांगी, ता. खटाव) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.वडगाव येथील जयरामस्वामी विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये सुमित शिकत होता. शनिवारी दुपारी तो दिवसभर गावातील गणेश मंडळाजवळ अन्य मुलांसोबत खेळत होता. संबंधित गणेश मंडळाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर देखावा केला आहे. शेतकरी आत्महत्येचा जिवंत देखावा मंडळाचे कार्यकर्ते सादर करीत आहेत. शनिवारी सायंकाळी सुमीत शेतावरून घरी आल्यानंतर देखाव्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याला प्रत्यक्षात गळफास लागला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने कºहाड येथील रुग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. देखाव्याचे अनुकरण करताना मुलाचा मृत्यू झाल्याने गावात, कुटुंबियात व त्याच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहेत़ अशा प्रकारे मृत्यू कोणावरही ओढवू नये, अशा शब्दांत सर्व दु:ख व्यक्त करत आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!