Share

राष्ट्रवादीने मला फोडले नाही, तर भाजपनेचं पक्षातून काढले : धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांचे घर फोडले, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे. शरद पवारांनी आमचे घर फोडले नसून भाजपने आम्हाला बाहेर काढले, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागरांचा आरोप खोडून काढला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, 12 जानेवारी 2012 ला भगवान बाबांच्या जयंतीच्या दिवशी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या भावाशी असलेलं रक्ताचं नातं तोडलं. आणि त्यानंतर भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शरद पवारांनी आम्हला फोडलं नसून भाजपनेच आम्हाला पक्षातून काढून टाकले, असे मुंडे म्हणाले.

जयदत्त क्षीरसागर हे एकेकाळी बीड राष्ट्रवादी कॉंग्रसचे धडाडीचे नेते होते. मात्र त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीवेळी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला. क्षीरसागर यांच्या पक्षांतरानंतर बीडच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे राजकीय फडावरून भाषण करताना क्षीरसागर यांच्या कडून मुंडेंच्या घराबाबत वारंवार भाष्य केले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेचं मुंडेंचे घर फोडले आहे, असा आरोप क्षीरसागरांकडून वारंवार केला जातो.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1177149596302102529?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177149198535282688?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177148948110163969?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!