बीड : गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारे बाप्पा त्याच्या गावी गेले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर ते परत गेले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यात सगळीकडे विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
राज्यात गणपती विसर्जन मिरवणूकीला अनेक ठिकाणी गालबोट लागले आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकातल्या एका ढोल वाजविणाऱ्या तरून मुलाने त्याचा १० हजार रुपयांचा मोबईल चोरीला गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश गौतम वडमारे(वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मोबाईल चोरीला गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याने गुरुवारी रात्री ९ वाजाच्या सुमारेस गळपास घेऊन आयुष्य संपविले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ सुरु आहे.
आकाश हा बीड शहरातील बलभीम चौक परिसरात राहत होता. तो पथकामध्ये ढोल वाजविण्याच काम करत होता. बुधवारी शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत असताना काही अज्ञात चोरट्यांनी आकाशच्या खिशातील मोबाईल चोरला. या गोष्टीमुळे आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस मोबाईल चोरांचा शोध घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मोबईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल चोरीच्या अशा किरकोळ कारणावरून तरुण मुलांनी स्वत:च आयुष्य संपवणे हे धक्कादायक आहे. दिवसेंदिवस मोबईलचा वाढता वापर हे आयुष्य संपविण्याच एक कारण ठरत आहे. मात्र मोबईल चोरीच्या या किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

